चोपडा शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची चौकशी करा निळे निशाण सामाजिक संघटनेची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


चोपडा शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची चौकशी करा निळे निशाण सामाजिक संघटनेची मागणी

चोपडा शहरात दि. 12 ऑगस्ट रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडा मुळे संपुर्ण जिल्हाभर हळहळ व्यक्त करण्यात आली तसेच दोन कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला आणि दोन निष्पाप जिवाना आपला जिव गमवावा लागला या प्रकरणी त्वरीत चौकशी होवुन दोषीवर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन निळे निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बावीस्कर यांनी चोपडा उपविभागिय पोलिस अधिक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.[ads id="ads1"] 

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, मयत राकेश राजपुत यांच्या आईच्या म्हणण्यानुसार डिसेंबर 2021 मध्ये वर्षा आणि राकेश यांचे प्रेम प्रकरणामुळे वर्षाचे नातेवाईकांनी राकेश राजपुतला घरातुन बळजबरीने घेऊन गेले होते. तेव्हा राकेशची आई शहर पोलिस स्टेशन चोपडा येथे गेली व पो. स्टे. चे पोलिस निरिक्षक अवतारसिंग चौव्हाण यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली व सांगितले कि भविष्यात माझ्या मुलाच्या जिवितास धोका आहे. [ads id="ads2"] 

 त्यामुळे पोलिस निरिक्षक अवतारसिंग चौव्हाण यानि सामनेवाला यांच्या विरुध्द प्रभावी व परिणामकारक कारवाई केली असती तर हा गुन्हा घडला नसता. आणि दोन्ही कुटुंबीयांचे न भरून निघणारे नुकसान झाले नसते. तसेच 12 ऑगस्ट 2022 रोजी घडलेल्या घटनेत संबधित पोलिस स्टेशन कडुन ज्या प्रकारे कारवाई होणे अपेक्षीत होते. आणि कायदयाच्या दृष्टीने बंधकारक होते त्या प्रकारे संबंधित पोलिस स्टेशन तर्फे कार्यवाही झालेली नाही.

घडलेल्या घटनेत कायदयाच्या दृष्टीकोणातुन व फिर्यादीनुसार कारवाई व्हायला पाहिजे होती. त्या प्रकारे कारवाई करण्यात आलेली नाही. फिर्यादी नुसार कारवाई कशी झालेली नाही. त्या विशेष मुददयांची प्रत व प्रथम खबरी अहवालाची प्रत निवेदना सोबत जोडलेली आहे त्याचे अवलोकन करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करा

अन्यथा लवकरच संबंधित अधिकाऱ्या विरुध्द आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागेल असा इशारा निळे निशान सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंदभाऊ बावस्कर यांनी प्रशासनाला दिला आहे.वी..


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!