95 टक्के लोकप्रतिनिधींना, आणि बोगस कामे करणाऱ्या ठेकेदारांना आत्मचिंतन करण्यालायक श्रीराम फाउंडेशन तर्फे कौतुकास्पद समाजसेवा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) समाजात राजकारणाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनां राबवून रस्त्यांसह इतर अनेक विकास कामांची बांधकामे मोठा गाजावाजा करून होत असतात परंतु राजकीय प्रभावामुळे आणि ठेकेदार संबंधित अधिकारी यांच्या संगनमतामुळे टक्केवारीच्या वाढत्या प्रमाणामुळे विकास कामांची गुणवत्ता खड्ड्यात गेली आहे.[ads id="ads1"] 

  विकास कामे रस्त्याची कामे झाल्यानंतर ती कामे किती वर्ष टिकायला पाहिजे याचे सर्व निकष,अटी,शर्ती ठेकेदारांनी जमिनीत गाडून टाकल्यामुळे बोगस आणि निकृष्ट प्रतीची कामे होत आहे आणि हे सर्व लोकप्रतिनिधींना समजून येत असून सुद्धा ते न समजल्या सारखे जनतेला दाखवितात. या मागील सर्व कारणे जनतेला माहीत आहे.अशा प्रकारच्या भ्रष्टाचार,गैरप्रकाराच्या मागे न लागता आरोप प्रत्यारोप न करता तसेच लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता समाज हिताच्या दृष्टिकोनातून रावेर येथील श्रीराम फाउंडेशन तर्फे स्वखर्चाने समाजसेवेचे जे काम करण्यात आले त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.[ads id="ads2"] 

    नुकतेच बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील रावेर ते सावदा दरम्यानच्या रस्त्याची डागडुजी करण्याचा उपक्रम श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी पार पाडला.

         बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या महामार्गावरील रावेर ते सावदा दरम्यान असलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले होते त्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.काही दिवसांपूर्वी खड्डे चुकवतांना अपघात झाले.या अपघातात काहींनी आपले प्राण गमावले.(अपघाताचा मागील इतिहास लक्षात घेता लोकप्रतिनिधीचे जवळच्या नातेवाईकांचे सुद्धा अपघातात निधन झाले आहे) नागरिकांना होणार त्रास लक्षात घेऊन तसेच रस्त्यावर कुणाचाही अपघात होऊन जीवीत हानी होऊ नये. यासाठी हा उपक्रम स्वखर्चातून श्रीराम पाटील यांनी केला. रस्त्याची डागडुजी करत असतांना नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या उपक्रमात प्रा.गोपाल दर्जी सर, डॉ.संदिप पाटील,फाउंडेशनचे उपाध्यक्ष स्वप्निल पाटील,सचिव दिपक नगरे,अ.मुत्तलिफ,शितल पाटील,सोपान पाटील,निलेश पाटील सर,नितीन पाटील सर, भुषण चौधरी सर,नितीन गाढे सर, राजीव सवर्णे,चंद्रकांत विचवे, राजेंद्र चौधरी,दिलीप कांबळे, ज्ञानेश्र्वर महाजन,दिलीप शिंदे, संजय बुवा,रजनीकांत बारी, हरीश जगताप,जगदीश घेटे,बाळु शिरतुरे,सोपान पाटील सर, सी.एस.पाटील सर,मेहमूद भाई, विवरे सरपंच सौ.स्वरा पाटील, विपीन राणे,पिंटू माळी,जीवन बोरनारे,चेतन पाटील,जहीर मिस्तरी,कालू भाई बर्फवाले, डॉ.मनोहर पाटील,वडगाव येथील सरपंच गोकुळ पाटील,प्रमोद कोंडे,युवराज महाजन,पोपट पाटील,प्रवीण पाटील,घनःश्याम पाटील,संजय पुनतकर,पंकज सपकाळ,योगेश महाजन,प्रदीप पाटील,श्रीराम फाऊंडेशन मित्र परिवार व रावेर विवरा,वडगाव,वाघोदा,सावदा येथील नागरिकांनी खड्डे बुजवत श्रमदान करून सहकार्य केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!