रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने महिला आघाडी मेळावा दिनांक 7 रोजी बुधवार रोजी दुपारी दोन वाजता खिर्डी येथील सोसायटीच्या हॉलमध्ये वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ.गायत्रीताई कोचुरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी धुळे येथील वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व जळगाव जिल्हा प्रभारी एडवोकेट रविकांत वाघ, जळगाव जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे, महासचिव दिनेश भाऊ ईखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. वंदनाताई सोनवणे, वंदनाताई अराक, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग हे असून यांचा सत्कार गायत्रीताई कोचुरे व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी केला.[ads id="ads1"]
वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाल्या की या देशात महिलांना जे अधिकार मिळाले आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. बाबासाहेब आंबेडकरांनी जर या भारताचे संविधान दिले नसते तर महिलांना आजही आपल्या पतीच्या निधना नंतर सती जावे लागले असते. अशी मनू ची प्रथा होती म्हणून महिलांना सांगणे आहे की आपल्याला जे संविधानामुळे अधिकार मिळाले त्या संविधानाचा सन्मान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर त्यांच्या उमेदवारालाच मतदान करा . अशा त्या म्हणाल्या.[ads id="ads2"]
वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे म्हणाले की या देशात श्रद्धे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा नेता आपल्याला मिळणार नाही कारण प्रकाश आंबेडकर यांचा एकच उद्देश असून इथला वंचित समाज सत्ते मध्ये बसविल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि इथल्या एसटी, एस. सी, ओबीसी. या समाजासाठी रात्रंदिवस न पाहता वंचीत समाजाला एकत्र करण्याचे काम बाळासाहेब आंबेडकरांनी केले असून आता महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी हा एकच पक्ष आहे आणि या पक्षाची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. असे ते म्हणाले.
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील खानापूर येथील तरुणाची विष घेऊन आत्महत्या ; रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
हेही वाचा :- मांडूळ सर्पाची तस्करी; रोझोदा येथील एकास अटक ; रावेर वनविभागाने केली कारवाई
उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व जळगाव जिल्ह्याचे प्रभारी एडवोकेट रविकांत वाघ म्हणाले की आपल्याला जो मताचा अधिकार मिळाला आहे तो बाबासाहेब आंबेडकरांमुळे कारण इथला टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांना जेवढा मतदानाचा अधिकार आहे तेवढा अधिकार रस्त्यावर फिरणाऱ्या भिकाऱ्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. म्हणून तमाम महिला पुरुष यांना सांगणे आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा. आपले जे अमूल्य मत आहे ते विकू नका. आपल्या मतदानाचा अधिकार समजून घ्या की आपल्या मताला इतकी मोठी किंमत आहे की आपण चांगल्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे. बहुजन सारे एक होऊ ,सत्ता आपल्या हातात घेऊ. असे एडवोकेट रविकांत वाघ साहेब म्हणाले.
या जिल्हा उपाध्यक्ष सौ.मीराताई वानखेडे, जिल्हा संघटक शोभाताई सोनवणे, जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजीर, कामगार सचिव बालाजी पठाडे, जिल्हा सचिव विजय मालविया, रावेर तालुका उपाध्यक्ष सलीम शहा यासीन शहा, ज्ञानेश्वर तायडे, गौतम अटकाळे, कंदर सिंग बारेला, मुक्ताईनगर येथील दिलीप पोहेकर, भुसावळ येथील शहर उपाध्यक्ष देवदत्त मकासारे, नव्याने वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करणारे कार्यकर्ते आद. दीपक वाघ उटखेडा, वाघाडी येथील नीलकंठ तायडे, खिर्डी येथील हर्षवर्धन सावंत, शाकीर पिंजारी, हरी कोचुरे, दीपक कोचुरे, गणेश करवले, जीवन सोनवणे, प्रकाश कोचुरे, राहुल करवले, राकेश विसपुते अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांनी व महिलांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.
या मेळाव्यासाठी तालुका उपाध्यक्ष सौ.रत्ना सोनवणे, सचिव सौ.लता कोचुरे, महासचिव आसमा पिंजारी, तालुका संघटक माधुरी भालेराव, वसंतबाई तडवी, संगीताबाई ठाकूर, शोभाबाई रायमळे, पुनम कोचुरे, मंगलाबाई ससाने, शारदाबाई तायडे या महिलांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील महिला आघाडी व तालुका पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी केले. आणि आभार वंचित बहुजन महिला आघाडीच्या रावेर तालुका अध्यक्ष सौ.गायत्री ताई कोचुरे यांनी मानले.


.jpg)