रावेर येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर तालुका मेडिसीन डिलर्स असोसिएशन रावेर तर्फे आयोजित फार्मासिस्ट दिन महाजन हॉस्पिटल येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र पाटील हे होते.[ads id="ads1"] 

यावेळी संजय चौधरी व गोविंद भाऊ महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर आदिवासी अती दुर्गम भागातील गारखेडा, मोरव्हाल, पिंपरकुंड, मुंजलवाडी, निंमड्या या जिल्हा परिषद शाळांना सचिव प्रवीण सरोदे , प्रथमेश मेडिकल, रावेर प्रायोजित प्रथमोपचार पेटी चे वितरण पंचायत समिती येथे गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी विलास कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.[ads id="ads2"] 

यावेळी ऊमेश श्रावगी ,रसलपूर यांच्याकडून फार्मासिस्ट बांधवांना डायरीचे वितरण करण्यात आले.

हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - रेल्वेतून पडून रावेर तालुक्यातील आभोडा-जिन्सी येथील ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

 यावेळी प.स चे मानकर सर, महाजन सर, कासम तडवी, विलास पाटील, मुनाफ तडवी, सर्व कार्यकारणी सदस्य व रावेर तालुक्यातील केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक अजय पाटील, मानकर सर यांनी केले. आभार लखन सावळे यांनी व्यक्त केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!