महापौर जयश्री महाजनांनी केला अय्युब तडवी, बिस्मिल्ला तडवी जुम्मा तडवी रुग्णसेवकांचा सत्कार
रावेर/मुबारक तडवी
जळगांव सारख्या जिल्ह्यांतील भल्या मोठ्या शहरात जळगांव शहरातील दवाखान्यात उपचारासाठी येत असलेल्या आजारी रूग्णांना त्यांचेशी काहीएक ओळख नातेसंबंध कसलेही लोभ आमिष नसतांना आजारी रूग्णांची माहीती मिळताच आस्थेवाईकपणे तात्काळ हजर होत तो कोणत्याही जाती धर्माचा असो रुग्णाला काय आजार आहे.[ads id="ads2"]
उपचारासाठी कोठे दाखल करायचे आहे उपचारासाठी पेशंटचे जवळ उपचारार्थ पैशाची तजवीज आहे किंवा नाही नसल्यास लोकवर्गणीतून देणगीदार दात्यांना आवाहन करुन रुग्णांना अनेक आजाराकरीता मदत मिळवून आर्थिक मानसिक आधार देणार्या व रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या जळगांव शहरातील तडवी भिल समाजातील नवयुवक तरुणांनी जळगांव जिल्हा समाजसेवक २४ तास रुग्णसेवा ग्रुप या व्हाट्सअप ग्रुप रुग्णसेवक ग्रुपचा रुग्णालयातील आजारी रुग्णांना मदत सहकार्य करण्याचे उत्कृष्ट प्रशंसनीय कार्य करणाऱ्या आरोग्यदूत रुग्णसेवकांची कार्याची बातमी[ads id="ads2"] जळगांव महापालिका महापौर श्री जयश्री महाजन यांना समजली आणि त्यांनी तडवी भिल समाजातील अय्युब उर्फ बबलू तडवी जुम्मा तडवी बिस्मिल्ला नसीर तडवी बबलू मोहंमद तडवी यांना निमंत्रित केले आणि सत्कार केला व आपण निस्वार्थ पणे रुग्णांना सेवा देत आप आपली नोकरी कामधंदा सांभाळून रात्रंदिवस २४ तास आरोग्य दूता सारखी सेवा उल्लेखनीय कामगिरी करत आहात अशी सेवा अविरत सुरू ठेवावी अशी मागणी वजा विनंती महापौर महाजन यांनी केली.
हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय
हेही वाचा : - रेल्वेतून पडून रावेर तालुक्यातील आभोडा-जिन्सी येथील ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
हेही वाचा :- यांनाच मिळणार PM Kisan च्या 12 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये; आपले नाव यादीत आहे की नाही ते तपासा



