रावेर तालुक्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा नागरिकांच्या तक्रार अर्जाचे निवारण करणे बाबत तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आवाहन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर तालुक्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा नागरिकांच्या तक्रार अर्जाचे निवारण करणे बाबत तहसिलदार उषाराणी देवगुणे यानी केले आवाहन

रावेर प्रतिंनिधी (राजेंद्र अटकाळे)

रावेर तालुक्यातील ७ मंडळ कार्यालयात फेरफार अदालत घेण्यात येणार आहे तरी रावेर तालुक्यातील नागरीकानी लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी केले.

    यात रावेर तालुक्यातील रावेर , खानापूर , खिरोदा प्र यावल , निंभोरा वु , ऐनपूर , सावदा , खिर्डी या मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी दिनांक 28/09/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता फेरफार अदालत घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने रावेर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहान करण्यात येते की , दिनांक 28/09/2022 रोजी बुधवार या दिवशी तलाठी व मंडळ अधिकारी यांचेकडील काही प्रलंबित अर्ज असतील तर त्यांनी आपले अर्ज सादर करण्यात यावे सदर अर्जावर फेरफार अदालतीमध्ये तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.[ads id="ads1"] 

   तरी रावेर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , आपण दिनांक 28/09/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता आपल्या मंडळ मुख्यालयी फेरफार अदालतीमध्ये अर्ज सादर करुन सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा , तसेच रावेर तालुक्यातील 41753 शेतकऱ्यापैकी 17932 शेतकन्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये पिकपेयाची नोंद केलेली असून अद्यापपावेतो 23821 शेतकऱ्यांचे ई पिकपाहणी नोंद करावयाची बाकी आहे . तरी ज्या शेतकऱ्यांचे ई पिकपाहणी करावयाची बाकी आहे त्यांनी तात्काळ ई पिकपाहणी वावत आपल्या मोबाईलमध्ये ई पिकपाहणी व्हर्जन -2 हे अॅप मोबाईल मध्ये डाऊनलोड करुन आपल्या पिकाची शेताच्या मध्यभागी जाऊन ई पिकपाहणी नोंदवावी.[ads id="ads2"] 

  अन्यथा जे शेतकरी मुदतीत ई पिकपाहणीची नोंद करणार नाहीत असे शेतकरी हे बँकेकडून पिक कर्ज , शासनाकडून नुकसान भरपाई , फळपिक विमा योजनेचा लाभ इतर शेतकऱ्यांच्या थेट लाभाच्या योजना यापासून वंचीत राहतील . तरी रावेर तालुक्यातील सर्व शेतकरी बंधु भगिनींना आवाहान करण्यात येते की , त्यांनी आपल्या मोबाईलद्वारे शेताच्या मध्यभागी जाऊन तात्काळ ई - पिकपाहणीची नोंद करुन शासनाच्या विविध योजनेतील सर्व लाभास पात्र रहावे.

हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - रेल्वेतून पडून रावेर तालुक्यातील आभोडा-जिन्सी येथील ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

हेही वाचा :- यांनाच मिळणार PM Kisan च्या 12 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये; आपले नाव यादीत आहे की नाही ते तपासा

 ई पिकपाहणीची नोंद करण्यात काही अडचण आल्यास गावातील संबंधीत तलाठी व मंडळ अधिकारी यांचेशी संपर्क करुन अडचणीचे निरसन करुन घ्यावे . रावेर तहसिल कार्यालयात झालेल्या बैठकीत तहसीलदार उषाराणी देवगुणे यानी केले आवाहन

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!