रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. एस. बी. पाटील हे होते. [ads id="ads1"]
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील रासेयोचे माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जयंत नेहेते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिपक पाटील यांनी केले. प्रा. डॉ. जयंत नेहेते यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे व माहिती समजावून सांगितली.[ads id="ads2"]
उच्च शिक्षण घेत असतांना विद्यार्थी व युवक यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा तसेच त्यांचे राष्ट्राच्या उभारणीत योगदान असावे हा उद्देश रासेयोचा आहे असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना रासेयोच्या ब्रीदवाक्य व बोधचिन्हांबद्दल सविस्तर माहिती सांगितली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधवाक्यातुन लोकशाही व सामाजिक बाधीलकीची जाणीव होते तसेच दुसर्या व्यक्तीचा दृष्टिकोन आपण विचारत घेतला पाहिजे असेही या बोधवाक्यातून सूचित होते असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय
रासेयोमध्ये उत्साहाने भाग व उत्साहाने उपक्रम राबवा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रसेयोचा स्वयंसेवक अल्ताफ पटेल याने केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिपक पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रेखा पाटील, रासेयो स्वयंसेवक अल्ताफ पटेल तसेच सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला एकूण ६८ स्वयंसेवक, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी नोंदणी केली.