रुग्णाच्या जीवाशी खेळत धोका दायक पद्धतीने वैद्यकिय व्यवसाय करणारे बंगाली डॉ, यांना जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांचा आशीर्वाद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 यावल प्रतिनीधी फिरोज तडवी, जिल्हा जळगाव

     यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी भागात मध्य प्रदेशमध्ये पॅरा मेडीलकल /ही पदवी घेऊन जळगाव जिल्ह्यात बंगाली डॉ यांनी राजरोस पने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला असून , यांना आळा बसण्यासाठी, तालुका वैद्यकीय असोसिएशन व मनसे यांनी यावल पोलिस स्टेशन, तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कडे बंगाली डॉ यांची चौकशी करून यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली असता, 

      सौखेडा सिम येथील उपकेंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांच्या पथकाने कोरपावली येथील बंगाली डॉक्टरांचे प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी जळगाव जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्या कडे पाठविली असून अहवाल येई पर्यंत तुमचा व्यवसाय बंद ठेवण्यात यावा अशा आशयाचे पत्र म्हणजे नोटिस बजावली असून अद्याप अहवाल प्राप्त झाला नसून तरी देखिल बंगाली डॉक्टरांचे वैद्यकिय व्यवसाय अगदीं कुणाला न जुमानता राजरोस पने सुरु असून, जिल्हा वैद्यकीय अधिकारी बंगाली डॉ यांना पाठीशी घालण्याचे काम करीत असून. 

  ग्रामीण भागातील गरीब आदिवासी जनतेच्या जीवाशी खेळ खेळत असून सुद्धा जिल्हा वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी डोळे झाक केल्या सारखे असून जीवित हानी झाल्यास याला आरोग्य विभाग जबाबदार असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे,.

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50 हजारची मदत थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरूवात

Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

  गावातील काही राजकारणी मंडळी सवतःला बलाढ्य समजून घेऊ जनतेच्या जीवाशी खेळत आलपे उखळ पांढरं शुभ्र करून बंगाली डॉक्टरांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न असल्याने काही जाणकारांकडून बोलले जात असून, गावात भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार राहणारी राजकारणी मंडळी समोर येणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे,

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!