रावेर पंचायत समितीच्या शौचालय अपहारप्रकरणी दाखल होणार दोषारोपपत्र, पोलिसांकडून प्रक्रिया सुरू; आतापर्यंत २४ जणांना अटक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर येथील पंचायत समितीत (Raver Panchayat Samiti) शौचालयाच्या अनुदानात झालेल्या घोटाळ्यात संशयित आरोपींच्या विरोधात आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणातील संशयित आरोपींविरोधात २७ जणांविरोधात दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.[ads id="ads1"] 

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत येथील पंचायत समितीच्या  (Raver Panchayat Samiti) माध्यमातून कर्मचाऱ्यांसह एजंटांनी अनुदान वितरणाचा लाभ घेत सुमारे एक कोटी ५४ लाख ६५ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. प्रकरणी २० एप्रिलला गट समन्वयक समाधान निंभोरे व समूह समन्वयक मंजुश्री पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [ads id="ads2"] 

या प्रकरणाची चौकशी रावेर पोलीस स्टेशनचे (Raver Police Station) पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी सूक्ष्म पद्धतीने करीत या गुन्ह्यात आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली आहे. 

हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

 या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण २४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र पुढील आठवड्यात न्यायालयात पोलिसांतर्फे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस प्रक्रिया सुरु आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!