यावल (सुरेश पाटील) शहरासह तालुक्यात पवित्र असा दुर्गोत्सव साजरा करताना अनेक ठिकाणी दुर्गोत्सव मंडळा जवळ सट्टा,पत्ता क्लब आणि बनावट देशी,गावठी,पन्नीची दारू सर्रासपणे खुलेआम विक्री होत आहे.यामुळे दुर्गादेवी आणि पोलिसांच्या आशीर्वादाने दुर्गोत्सव मंडळ अवैध धंदे सुरू असल्याने पोलिसांनी अवैध धंदे चालकांना परवानगी दिली आहे का?याबाबत समाजात तालुक्यात बोलले जात आहे.[ads id="ads1"]
काल दि.27 रोजी रात्री एका दुर्गोत्सव मंडळाजवळ पत्त्याचा क्लब सुरू असताना दुसऱ्या बाजूला त्याच ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या काही तरुणांनी दुर्गा देवीच्या आणि म्हसोबाच्या साक्षीने रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान एका मुलीची छेड़खानी केली.त्यामुळे सट्टा,पत्ता आणि बनावट देशी व गावठी,पन्नी दारू सर्रास पणे खुलेआम आणि तेही ठराविक ठिकाणी विक्री होत असल्याने यांना पोलिसांनी कोणत्या नियमानुसार परवानगी दिली?[ads id="ads2"]
दुर्गोत्सव मंडळ आणि ठराविक ठिकठिकाणी आणि पोलीस आणि होमगार्ड बंदोबस्त आहे किंवा नाही? दुर्गोत्सव काळात पोलिसांची रात्रीची गस्त होत नाही का?आणि बंदोबस्त गस्त होत असेल तर दुर्गोत्सव मंडळाजवळ जे अवैध धंदे सुरू आहेत त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने
हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
पोलीस अधीक्षक जळगाव,गुन्हे अन्वेषण विभाग जळगाव आणि फैजपूर भाग डीवायएसपी यांनी आपले लक्ष केंद्रित करून अनेक ठिकाणी एकाच वेळेला धाडी टाकून थातूरमातूर कारवाई न करता प्रत्यक्ष अवैध धंदे करणाऱ्या(इतर दुसऱ्या पत्ता खेळणाऱ्यांवर कारवाई न करता) मूळ जबाबदार मालकांवर क्लब चालवण्याऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी अशी जनतेसह आणि समाजातून मागणी होत आहे.



