ऐनपुर प्रतिनिधी - विजय एस अवसरमल
ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात सन २०२१ / २०२२ या वर्षी इयत्ता १० वी१२ वी मध्ये शाळेत एक नंबर ते पाच नंबर आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संवेदना फाऊंडेशन मुक्ताईनगर यांच्या मार्फत प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले.[ads id="ads1"]
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळातील १ ते ५ गुणांकाने पास झालेल्या १२ वी व १० वी च्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा भव्य सत्कार समारंभ संवेदना फाऊंडेशन मुक्ताईनगर यांच्या अंतर्गत येथे मोठ्या अभिमानाने संपन्न झाला.[ads id="ads2"]
याप्रसंगी ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयातील बारावीतील विद्यार्थीनी दिया चौधरी,विभुषा पाटील,मेहल पाटील, निकीता कोळी,स्नेहा अवसरमल तर दहावीची विद्यार्थीनीं समृध्दी पाटील संचिंता बारी,सृष्टी पाटील, मनिषा अवसरमल यांचा सत्कार विधान परिषदेचे सन्माननीय आमदार एकनाथरावजी खडसे व अँड रोहीनी ताई खडसे यांचे शुभ हस्ते सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
हेही वाचा :-रावेर तालुक्यातील खानापूर येथील तरुणाची विष घेऊन आत्महत्या ; रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
हेही वाचा :- मांडूळ सर्पाची तस्करी; रोझोदा येथील एकास अटक ; रावेर वनविभागाने केली कारवाई
पालक वर्ग व शिक्षक यांनी अँड रोहिणीताईंच्या या संवेदना फाऊंडेशनच्या उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन कौतुक केले या गुणगौरव सोहळ्याला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थी पालक शिक्षकांची मोठी उपस्थिती होती.


