https://maps.app.goo.gl/dPBiHadfLTEGgCGu6





 

लंपीग्रस्त गुरांसाठी शासकीय विमा योजना राबविण्याची मागणी ; डॉ. कुंदन फेगडे यांनी दिले डॉ. विखे पाटील यांना निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

लंपीग्रस्त गुरांसाठी शासकीय विमा योजना राबविण्याची मागणी ; डॉ. कुंदन फेगडे यांनी दिले डॉ. विखे पाटील यांना निवेदन

 यावल (सुरेश पाटील)

ग्रामीण भागात गुरांवर होणाऱ्या लंपी स्किन डिसीज आजारा मुळे ज्या शेतकऱ्यांचे,पशुधनाचे नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत मिळण्याबाबत आणि गुरांसाठी शासकीय विमा योजना राबविण्याबाबत महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉ.कुंदन फेगडे यांनी मागण्यांचे निवेदन दिले.[ads id="ads1"] 

       जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात गेल्या दोन,तीन महिन्यापासून ग्रामीण भागात शेतकऱ्यांनच्या गुरांवर लंपी स्किन डिसिज या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.हा आजार अतिशय जलद गतीने पसरत आहे.या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन, तीन महिन्याभरात जळगाव जिल्ह्यात व महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या गुरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.[ads id="ads2"] 

   त्यात काही गुर दगावले सुद्धा आहेत.या संपूर्ण झालेल्या नुकसानाची चिंता हि पशुधन पालकांना व शेतकऱ्यांना भेडसावत असून यासाठी शासनातर्फे तात्काळ उपाय योजना करून आर्थिक मदत मिळावी.

हेही वाचा :- रावेर तालुक्यातील खानापूर येथील तरुणाची विष घेऊन आत्महत्या ; रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

हेही वाचा :- मांडूळ सर्पाची तस्करी; रोझोदा येथील एकास अटक ; रावेर वनविभागाने केली कारवाई 

तसेच गुरांसाठी शासकीय विमा योजना तयार करून राबविण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!