रावेर प्रतिनिधी राजेंद्र अटकाळे
मध्य रेल्वे मार्गावरील रावेर येथील स्थानकावर महानगरी एक्सप्रेस नियमित थांबत होती परंतु कोरोना लॉक डाऊन काळापासून सदर गाडी बंद करण्यात आली होती तिचा थांबा पूर्ववत सुरु व्हावा यासाठी रेल्वे राज्य मंत्री ना. रावसाहेब दानवे यांना भाजपा पदाधिकारी यांनी निवेदन देवून मागणी केली आहे. [ads id="ads1"]
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांच्या सह पदाधिकारी यांनी रेल्वे राज्य मंत्री ना. रावसाहेब दानवे यांना प्रत्यक्ष भेटून वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, भारतीय रेल्वे प्रशासनाने कोरोना लॉक डाऊन काळात अनेक रेल्वे गाड्या बंद केल्या होत्या. त्याच काळात महानगरी एक्सप्रेस गाडी क्रमांक २२१७८ व २२१७७ हि देखील बंद करण्यात आली होती.[ads id="ads2"]
परंतु आता संपूर्ण परिस्थिती आणि जन जीवन सुरळीत सुरु झालेले असून हि गाडी देखील सुरु करण्यात येवून रावेर येथील त्या गाडीचा असलेला थांबा पूर्ववत करण्यात यावा. या गाडीमुळे नाशिक मुंबई जाणारे आणि येणारे तसेच दररोज अप डाऊन करणारे असंख्य प्रवाश्यांची गैर सोय झाली व होत आहे म्हणून तत्काळ या मागणीकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे शेतमजूराची आत्महत्या ; परिसरात खळबळ
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
निवेदन देतांना श्री महाजन यांच्या सोबत सुरेश धनके, नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, दिलीप पाटील, वासू नरवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.