रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे शेतमजूराची आत्महत्या ; परिसरात खळबळ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

ऐनपुर ता. रावेर येथे एका शेतमजूराने नदी च्या पात्रात आत्महत्या केली आहे.सविस्तर वृत्त असे की ऐनपुर ता. रावेर येथे दिनांक २६/०९/२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता च्या सुमारास लक्ष्मण किसन महाजन ( चोपडे ) वय ५३ वर्षे यांनी ऐनपुर व विटवा या दोन्ही गावाच्या मध्ये असलेल्या ऐनपुर शिवारातील तापी नदीच्या बॅक वॉटर च्या पुलावरून उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.[ads id="ads1"] 

  सदर घटनेची ऐनपुर येथील पोलिस पाटील दिपाली तायडे यांनी निंभोरा पोलीस स्टेशन येथे खबर दिली या खबरीवरुन निंभोरा पोलीस स्टेशन चे ए पी आय गणेश धुमाळ व कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.[ads id="ads2"] 

   गावातील नदीच्या पात्रात पट्टी चे पोहणारे एकनाथ भिल्ल यांनी लक्ष्मण किसन महाजन (चोपडे) यांना फुगोट्याच्या पाण्यातून बाहेर काढले प्रेत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले असून आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही.

हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

 पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशन चे ए पी आय गणेश धुमाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी कॉन्स्टेबल प्रभाकर धसाळ हे करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!