रावेरमधील "त्या" लाचखोर वजनमापे निरीक्षकांना "इतक्या" दिवसाची पोलिस कोठडी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


पेट्रोल पंपावरील चार नोझल मशीन्स स्टॅपींग करून प्रमाणपत्र देण्यासाठी रावेरातील वजनमापे निरीक्षक सुनील रामदास खैरनार (56, रा.एमआयटी कॉलेजजवळ, मुक्ताईनगर) यांना 32 हजारांची लाच स्वीकारताना मंगळवारी दुपारी तीन वाजता जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केली होती. खैरनार यांना बुधवारी दुपारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.[ads id="ads1"] 

लाच स्वीकारताच केली होती अटक

रावेर शहरापासून (Raver City)  दोन किलोमीटर अंतरावर भुसावळातील तक्रारदाराचा एस.एस.बिंबे अ‍ॅण्ड सन्स पेट्रोल पंप असून त्यांनी तो 11 महिन्यांच्या कराराने चालवण्यास घेतला आहे.[ads id="ads2"] 

   पंपावरील चार नोझल मशीन्स स्टॅपींग करून प्रमाणपत्र देण्यासाठी मंगळवारी आरोपी तथा वजनमापे निरीक्षक सुनील खैरनारे याने 32 हजारांची लाच मागितल्याने एसीबीकडे (ACB) तक्रार नोंदवण्यात आली होती.

हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

 संशयीत आरोपी पंपावर लाच घेण्यासाठी दुपारी तीन वाजता आल्यानंतर पंचांसमक्ष आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला बुधवारी भुसावळ न्यायालयात (Bhusawal Court) हजर केल्यानंतर एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!