शासनाच्या विविध दिव्यांग कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना ४० टक्के किंवा अधिक ऑनलाईन प्रमाणपत्र बंधनकारक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व प्रकारच्या दिव्यांगांची तपासणे सुविधा उपलब्ध होती मात्र कर्णबधिर दिव्यांगांना तपासणीसाठी धुळे ,औरंगाबाद, मुंबई येथे तपासणीसाठी जावे लागत होते त्यामुळे कर्णबधिर दिव्यांगांची फार दमछाक होत होती.[ads id="ads2"]
या संदर्भात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांनी कर्णबधिर दिव्यांगांची तपासणीही जिल्ह्यातच व्हावी यासाठी प्रजासत्ताकदिनी, स्वातंत्र्यदिनी,जागतिक दिव्यांग दिनि विविध उपोषणे ,आंदोलने ,मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधून कर्णबधिर दिव्यांगांच्या तपासणीसाठी उपकरणे उपलब्ध करावी ही मागणी लावून धरल्यानंतर आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्णबधिर दिव्यांगांची तपासणी काढण्यासाठी अद्ययावत एडेड ऑडिऒग्राम व बेरा मशिन नुकतेच उपलब्ध झालेले असल्यामुळे कर्णबधिर दिव्यांगांना दिलासा मिळालेला आहे व यामुळे जिल्ह्यातील विविध स्तरातून स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांचे कौतुक होत आहे.


