यावल ( प्रतिनिधी ) फिरोज तडवी
जळगाव जिल्ह्यातील यावल ते विरावली रस्त्या दरम्यान दोन मोटरसायकलीं समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात पाच जण जख्मी झाले असुन यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असुन त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे .[ads id="ads1"]
या संदर्भात मिळालेली माहीती अशी शनीवारी सांयकाळी ५ते ५ , ३oवाजेच्या सुमारास विरावली-यावल रस्त्या दरम्यान दोन मोटरसायकलींनी समोरा समोर धडक दिल्याने भिषण अपघात झाला असुन , या अपघातात पाच जण जख्मी असल्याची माहीती समोर येत असुन , यात जखमींची नांवे सागर चंद्रकांत तायडे २५ व भीमराव इंधाटे दोघ राहणार कोरपावली तर गणेश संजय चौधरी २२ आणी मोहीत संतोष पाटील राहणार विरावली ,गौरव पुर्ण माहीत नाही असे पाच जण या अपघातात जख्मी झाले आहे. [ads id="ads2"]
सर्व जख्मींवर यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ जिशान खान यांनी व त्यांच्या सहकार्यानी जखमींवर प्रथमपोचार केलेत व यातील दोन गंभीर जख्मींना जळगावच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तर दोन जणांना भुसावळच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हेही वाचा : Big Breaking : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात मात्र अद्याप अपघाताची नोंद झाली नसल्याचे कळाले असुन , अपघात झाल्याचे वृत्त कळताच यावल भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , भाजपाचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, मुवा मोर्चाचे परेश नाईक, भुषण फेगडे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जख्मींच्या तात्काळ उपचारासाठी प्रयत्न केले.