जात वैधता प्रमाणपत्रासाठी मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर माहिती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


पुढील शैक्षणिक वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाला राखीव संवर्गातील कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना आतापासून जात पडताळणी समितीकडे याबाबतचे अर्ज सादर करावे लागणार आहेत. यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने ३१ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.[ads id="ads1"] 

विविध राखीव प्रवर्गातून वैद्यकीय, दंतवैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी आदींसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी हे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सध्या बारावी विज्ञान शाखेत व पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज हा ते शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशींसह सामाजिक न्याय विभागाकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.[ads id="ads2"] 

विद्यार्थ्यांनी या वैधता प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी अर्जासोबत आपापल्या महाविद्यालयाचे शिफारस पत्र, १६ ‘अ’ फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षांचे बोनाफाइड प्रमाणपत्र आणि जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी कागदपत्रांच्या पुराव्यांच्या साक्षांकित प्रतीसह जिल्हा जात पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्‍यक असल्याचे पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या 

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

हा अर्ज सादर करतेवेळी अर्जदार विद्यार्थी किंवा त्याच्या पालकाने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे. ऑनलाइन फॉर्ममध्ये जातीच्या दाखल्यामध्ये असलेला तपशील भरला जातो. या तपशिलानुसारच जात वैधता प्रमाणपत्राची ऑनलाइन प्रणालीमध्ये निर्मिती होते. त्यामुळे जातीच्या दाखल्यावरील तपशील व ऑनलाइन फॉर्म भरतेवेळी दिलेली माहिती सारखीच असल्याची खात्री प्रत्येकाने करावी, असे आवाहनही सामाजिक न्याय विभागाने केले आहे.

बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना बारावीनंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी प्रवेशप्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात पडताळणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्‍यक आहे.

–संतोष जाधव, संशोधन अधिकारी, जिल्हा जात पडताळणी समिती

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडे (बार्टी) सादर करावा लागेल. बार्टीने पात्र विद्यार्थ्यांना घरबसल्या अर्ज भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना बार्टीच्या https://bartievalidity.maharashtra.gov या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!