जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : काही दिवसापूर्वी राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या (IAS Officer) बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आता आयपीएस अधिकाऱ्यांच्या (IPS Officer) बदल्या झाल्या आहेत. त्यात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची दि २० रोजी रात्री उशिरा बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकपदी नागपूर लोहमार्ग पोलीसचे एम.राजकुमार यांची वर्णी लागली आहे.[ads id="ads1"]
सध्या राज्यातील पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरु झाले आहे. आज दिनांक 20ऑक्टोंबर 2022 रोजी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेऊन राज्यातील २५ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत.[ads id="ads2"]
जळगांवच्या पोलीस अधिक्षकपदी (Jalgaon SP) कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आज २० ऑक्टोबर रोजी गृहविभागाने बदली व पदस्थापनेचे आदेश निर्गमीत केले आहेत. त्यानुसार नागपुर लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची जळगांव चे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या बदलीच्या ठिकाणचे आदेश अद्याप निर्गमीत करण्यात आलेले नाहीत.
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
राज्य शासनाच्या गृह विभागाचे सचिव व्यंकटेश भट्ट यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशात राज्यातील २५ पोलीस अधीक्षकांना नवीन नियुक्ती देण्यात आली आहे. त्यातील १९ पोलीस अधीक्षकांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. जळगांव जिल्ह्यासाठी नूतन पोलीस अधीक्षकपदी एम. राजकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगांवचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह १९ पोलीस अधीक्षक नवीन नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
नव्या नियुक्तींमध्ये नवीन जिल्ह्यात पदस्थापना मिळालेले पोलीस अधीक्षक पुढील प्रमाणे आहेत.
धनंजय कुलकर्णी रत्नागिरी, पवन बनसोड सिंधुदुर्ग, बसवराज तेली सांगली, शेख समीर अस्लम सातारा, अंकित गोयल पुणे ग्रामीण, शिरीष सरदेशपांडे सोलापूर ग्रामीण, राकेश ओला अहमदनगर, एम. राजकुमार जळगाव, रागसुधा आर. परभणी, संदीपसिंह गिल हिंगोली, सोमय विनायक मुंडे लातूर, सारंग आव्हाड बुलढाणा, गौरवसिंह यवतमाळ, संदीप घुगे अकोला, रविंद्रसिंह परदेशी चंद्रपूर, नूरल हसन - वर्धा, निखिल पिंगळे गोंदिया, निलोत्पल गडचिरोली, संजय बारकुंड धुळे, श्रीकांत परोपकारी ठाणे शहर, सचिन पाटील गुन्हे अन्वेषण विभाग औरंगाबाद, यांच्यासह राज्यपालांचे एडिसी सिंगुरी विशाल आनंद यांना नागपूर ग्रामीण जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे.
भा.पो.से./ रा.पो.से. अधधका-याांच्या
बदली/ पदस्थापनेबाबत आदेश (Click Here)