चिनावल ता.रावेर प्रतिनिधी (किरण बी. भालेराव) रावेर तालुक्यासह जिल्ह्यातील बौद्ध उपासक यांना आपणास निमंत्रीत करण्यात येते कि भीमज्योती बुध्द विहार चिनावल (तालुका रावेर जिल्हा जळगाव) येथे वर्षावास तथा श्रामणेर प्रशिक्षण शिबीर समारोप आणि धम्मदिक्षा सोहळा दिनांक ०९/१०/२०२२ रविवार रोजी आयोजित केला आहे. तरी आपली उपस्थिती वंदनीय आहे.[ads id="ads1"]
अशी असेल कार्यक्रमाची रूपरेषा
दुपारी १२ ते ३ पर्यंत. (धम्मफेरी) निघणार असून दुपारी ठीक ३.३० ते ५.०० यादरम्यान धम्मदेसना पुज्य. भदन्त नागवंश (महाथेरो ) क्रांतीकारी धम्म प्रचारक,नागपुर हे देणार असून संध्याकाळी ठीक ५.०० ते ८.०० यादरम्यान सामुहिक भोजनाचे सुद्धा आयोजन केले आहे.[ads id="ads2"]
तरी रावेर तालुक्यासह जिल्ह्यातील बौद्ध उपासक यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक भीमज्योती बुद्ध विहार समिती,उपासक उपासिका संघ चिनावल, ता. रावेर जि.जळगाव (खानदेश) यांनी केले आहे.
टीप : येतांना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यावे