Dharangaon : कृष्ण गीता नगर मध्ये सुविधा नाही !... तर " घरपट्टी [ कर ] भरणार नाही ; वारंवार निवेदन देऊन देखील कोणीही दखल घेत नाही - कृष्णा गीता नगरवासी

अनामित


धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर

धरणगांव - आज रोजी कृष्ण गीता नगरवासीयांनी धरणगाव नगरपरिषद येथे कर कमी करण्याबाबतचा विनंती अर्ज दिला. धरणगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील कृष्ण गीता नगर गट नंबर ५४६ मधील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे.[ads id="ads1"] 

पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि कॉलनी वासी व ज्येष्ठ नागरिक शाळेतील मुलं यांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. काही दिवसांपूर्वी तर एक ज्येष्ठ नागरिक गाडीवरून पडून त्याला मोठी जखम झाली. शालेय विद्यार्थी देखील अनेकदा सायकलीवर शाळेत जात असतांना पडलेले आहेत.[ads id="ads2"] 

            कॉलनी वासीयांतर्फे मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, नगर परिषदेचे प्रशासक जनार्दन पवार साहेब यांना अनेकदा निवेदन देऊन देखील आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या 

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

 कॉलनीवासी दरवर्षी न चुकता नगरपालिकेची नियमित घरपट्टी भरून देखील ही अवस्था आहे. कॉलनीत कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. आता कॉलनी वासीयांनी एकमताने ठरविले की, आपल्या कॉलनीत सुविधा नाही !... तर कर भरणार नाही !....

          याप्रसंगी कृष्ण गीता नगर मधील सर्व कॉलनिवासी उपस्थित होते.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!