बाप रे ! अमळनेर येथील लाचखोर मंडल अधिकाऱ्यासह तलाठी एसीबीच्या जाळ्यात

अनामित

अमळनेर - शहर तलाठी गणेश राजाराम महाजन (वय 46) व मंडल अधिकारी दिनेश शामराव सोनवणे (वय 48) या दोघांना एसीबीच्या पथकाने सापळा रचत दिड लाख रूपयांची लाच स्विकारताना आज दि.13 रोजी ताब्यात घेतले. मंडल अधिकारी व तलाठी या दोघं महसूल कर्मचारी यांनी दोन लाख रूपये लाच मागीतली यात तडजोड करत दिड लाख रू. घेताना जाळ्यात सापडले. तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे 3 डंपर आहेत

व करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्रं.MH18 AA 1153 हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे 2 महिन्यापुर्वी तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आलेले होते. सदरचे डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे क्रं.1 व 2 यांनी पंचासमक्ष 1,50,000 रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम 1,50,000 रुपये आरोपी क्रं.1 यांनी तलाठी कार्यालय अमळनेर येथे पंचांसमक्ष स्वीकारली असता दोघं संशयीतांना अटक केली.[ads id="ads2"]

लाचेची मागणी 1,50,000/-रुपये , लाच स्विकारली 1,50,000/-रु.,हस्तगत रक्कम 1,50,,000/-रू.,लाचेची मागणी दि.12/10/2022 , लाच स्विकारली दि.13/10/2022 या विषयाची माहीती कळताच ही कारवाई DYSP शशिकांत एस.पाटील, PI संजोग बच्छाव, PI एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी यांनी केली.

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!