ग्रामीण रुग्णालय धरणगाव कडून विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप !
धरणगांव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर
धरणगाव - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय धरणगाव यांच्या तर्फे राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले हायस्कूल शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.[ads id="ads1"]
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य सेवक रियाज देशमुख, समुपदेशक ( RKSK ) गणेश कुंभार, आरोग्य सेविका दीपा मोरावकर उपस्थित होते.[ads id="ads2"]
आरोग्य सेवक रियाज देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्य विषयी विस्तृत अशी माहिती सांगून मार्गदर्शन केले. गणेश कुंभार यांनी स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक एम.बी.मोरे, एस. व्ही.आढावे, पी.डी.पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी.पाटील यांनी तर आभार एच.डी. माळी यांनी मानले.


