यावेळी साकोरा ग्रामपालिकेला दिलेल्या अर्जाचे वाचन करण्यात आले. यामध्ये साकोरे गावातील अवैध धंदे, जुगार मटका बंद करण्यात यावी व शालेय परिसरातील आवारा लागत दारू धंदे व जुगार भटके सर्रासपणे चालत असल्यामुळे गावातील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.[ads id="ads2"]
रसायन युक्त अवैध गावठी दारूमुळे शालेय मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे. रसायन युक्त दारूच्या अतिवेशनामुळे गावातील तरुण वर्ग व गोरगरीब कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. त्यांना महिलांच्या अंगावरील मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
यापूर्वीही साकोरे ग्रामपंचायतीने महिला ग्रामसभेमध्ये दारूबंदी करण्याचा ठराव करून सदर पत्र व्यवहार संबंधित डिपार्टमेंटला केला आहे. तेव्हा यावर पोलीस स्टेशन व संबंधित दारूमध्ये विभाग यांचे मार्फत उपयोजना करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी. सदर अवैध दारू धंदे, मटका, जुगार बंद करण्यात यावी अशा आशयाचे पत्र ग्राम पंचायत मार्फत देण्यात आले आहे. तरी देखील प्रशासनाने कुठलीही प्रकारची दखल न घेतल्याने साकोरे गावातील ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत गाठत आंदोलन केले. याबाबत पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.