यावल प्रतिनिधी [ निलेश पाटील ]
आज दिनांक 13/10/2022 वार गुरुवार रोजी साकळी केंद्राची शिक्षण परिषद प्राथमिक शाळा मनवेल ता.यावल येथे संपन्न झाली.[ads id="ads1"]
सर्वप्रथम सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदरच्या महत्वपूर्ण शिक्षण परिषदेत डाएट, जळगाव यांच्या पत्रका प्रमाणे खालील विषय घेण्यात आले.
[ads id="ads2"]
*शिक्षण परिषद विषय*
१- नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र व मार्गदर्शन सचिन धालपे सर यांनी केले.
2 - शिक्षक पर्व प्रश्नपेढी निर्मिती चर्चा व मार्गदर्शन समाधान कोळी सर,
साकळी बाॅईज यांनी केले .
३- निपुण चाचणी आढावा चर्चा व मार्गदर्शन केले गेले .
४- संकलित मूल्यमापन आढावा,चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
५-Vopa मार्गदर्शन:दीपक चव्हाणसर शिरसाड शाळा यांनी मार्गदर्शन केले.
६-प्रशासकीय विषय केंद्र प्रमुख किशोर चौधरी सर यांनी घेतले.
विशेष नमुना पाठ सचिन धालपे सर कन्या शाळा साकळी यांनी मनवेल शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवत उत्कृष्ट असा कृतीयुक्त पाठ घेतला. विशेष मार्गदर्शन शि. वि. अधिकारी धनके साहेब यांनी परिषदेत भेट देवून आपले अमूल्य मार्गदर्शन केले बी.आर.सी. यावल येथील साधन व्यक्ती जाधव सर व तोडकर सर यांची उपस्थिती लाभली.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
स्तुत्य उपक्रम - मोरे सर जेष्ठ शिक्षक शिरसाड शाळा यांनी नमुना पाठात सामील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य घेण्यासाठी 500 रूपये रोख बक्षीस दिले.तसेच श्याम पाटील सर, माध्यमिक कन्या शाळा शिरसाड यांनी विद्यार्थ्यांना कॅडबरी चॉकलेट वाटप केली.आज च्या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष किशोर सर केंद्रप्रमुख होते.
सुत्रसंचालन प्रविण पाटील सर यांनी केले.आभार ज्योती मॅडम यांनी शाळे तर्फे तर किशोर चौधरी सर यांनी केंद्रा तर्फे आभार मानले. सदर शिक्षण परिषदेस साकळी केंद्राचे सर्व शाळाचे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.