भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने रावेर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)  : भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. रावेर तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात आरएसएस व बीजेपीच्या माध्यमातून संविधानद्रोहाच्या विरोधात याचबरोबर यूपीमध्ये बामसेफच्या अधिवेशनाला विरोध करून मूलभूत अधिकाऱ्यांचे हनन करण्याचा आरोप करण्यात आला. [ads id="ads2"]  

  संविधान बदलण्याच्या विरोधात, ईव्हीएमच्या विरोधात तसेच ओबीसी जाती आधारित जनगणना न करणाऱ्यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आले. १२ कोटी भटक्या विमुक्तांना त्यांच्या मूलभूत अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवल्याचा आरोप केला.

संविधानविरोधी RSS च्या देशघातकी धोरणांच्या विरोधात विभिन्न मुद्द्यांवर भारत मुक्ती मोर्चा,रावेर युनिटच्या वतीने रावेर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरने आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा : विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- SBI Mudra Loan मुद्रा लोन योजनेमार्फत "यांना" मिळणार  एक लाख रुपयांपर्यंत कर्ज

       आरएसएस-बिजेपीद्वारे भारतात होत असलेला संविधान द्रोह,संविधान बदलविण्याचा आरएसएस बिजेपीचा अजेंडा,ओबिसींची जातआधारित जनगणना न करणे,ओबिसींना,आदिवास्यांना जबरदस्ती हिंदु बनविणे,घोटाळेबाज इव्हीएम मशिनद्वारेच मतदान करणे,भारतातील बौद्ध विरासतीवर आरएसएसचा कब्जा असणे,मनुस्मृती मानसिकतेतुन देशात इंद्रकुमार मेघवाल तसेच असंख्य हत्या करणे,बिलकिस बानोला न्याय न मिळणे,भारतीय संविधानात अनुच्छेद 19 चे ऊल्लंघन करणे व अशा असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करत असल्याचे मा.नितिन गाढे (भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष) यांनी सांगितले.

      मा.महेश तायडे सरांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मा.सोपान पाटील सर,मराठा सेवा संघाचे किशोर पाटील सर ,तसेच आदिवासी संघठना,मुस्लिम संघठना यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला व सहभागी राहीले.

रविंद्र चौधरी सर,प्रकाश तायडे,बापु सोनवणे,योगेश अटकाळे ,नुर महंमद तडवी व असंख्य कार्यकर्ते ऊपस्थित होते.दखल न घेतल्यास आंदोलकांचा शासनाला जेलभरोचा इशारा देण्यात आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!