रावेर तालुक्यातील खिर्डी बु !! येथील ग्रामसेवक/ सरपंच यांचेवर कायदेशीर कार्यवाही होणार का ? सामाजिक कार्यकर्ता प्रशांत गाढे यांचा संतप्त सवाल
रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) सविस्तर वृत्त असे की,रावेर तालुक्यातील मौजे रेंभोटे ते खिर्डी रस्त्यादरम्यान मौजे खिर्डी बु !! येथून दररोज मोठ्या प्रमाणात घनकचरा टाकला जातो ज्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गेल्या ४-५ महिन्यापासून याबाबत संबंधित विषय याबद्दल सामाजिक कार्यकर्ता प्रशांत गाढे यांनी तक्रारी करूनही पाठपुरावा करूनही निगरगट्ट प्रशासनाला कीव येताना दिसून आली नाही.
आतापर्यंत यांना दिलेले आहे निवेदन
मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव), मा. उपअभियांता सो. प्र.ग्रा.स.यो.(म.ग्रा.र.वि.सं., जळगाव), मा. तहसीलदार सो. रावेर, मा. गटविकास अधिकारी सो. रावेर, मा. विस्तार अधिकारी सो. रावेर, मा. सरपंच / ग्रामसेवक सो. खिर्डी बु !! यांना निवेदन देऊनही आणि सदर अधिकाऱ्यांनी मा. सरपंच/ ग्रामसेवक सो. खिर्डी बु !! यांना सूचना करूनही काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. [ads id="ads1"]
त्यानंतर रावेर पंचायत समितीचे मा. विस्तार अधिकारी सो. रावेर यांनी स्वतः मा. ग्रामसेवक सो. खिर्डी बु !! यांना मौखिक तथा लेखी सांगितले असता मा. ग्रामसेवक यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाला न जुमानता कोणतीही कार्यवाही केली नाही उलट त्यांनी जास्तीचा घनकचरा त्याठिकाणी टाकायला सुरुवात केली. असा आरोप सामाजिक कार्यकर्ता प्रशांत गाढे यांनी अशी कैफियत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदना द्वारे मांडली.[ads id="ads2"]
तसेच मा. विस्तार अधिकारी सो. रावेर हे स्वतः पाहणी करायला आले असता आणि जनसमुदायाचा रोष लक्षात घेता त्यांनी स्वतः प्रकरणाचे गांभीर्य मा. ग्रामसेवक सो. खिर्डी बु !! यांना लक्षात आणून दिले आणि आपण “स्वच्छ भारत मिशन” राबवत असून अमाप असे ग्रामस्थ मौजे खिर्डी बु !! येथील हरी लक्ष्मण पाटील विद्यालय / अभिषेक भास्कर पाटील विद्यालयांच्या मागील बाजूस उघड्यावर शौचालयाला बसत आहेत हे सुद्धा लक्षात आणून दिले. परंतु मा. ग्रामसेवक सो. खिर्डी बु !! हे काहीही ऐकायला तयार नाहीत किंवा कोणतीही कार्यवाही करायला तयार नाहीत.
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- SBI Mudra Loan मुद्रा लोन योजनेमार्फत "यांना" मिळणार एक लाख रुपयांपर्यंत कर्ज
वरील सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर सर्व अधिकाऱ्यानी रीतसर मा. ग्रामसेवक/ सरपंच सो. खिर्डी बु !! यांना कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतरही सदर ग्रामसेवक/ सरपंच हे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे बेफिकिरपणे दुर्लक्ष करतात तर आपण विचार करू शकतात कि, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे कसे सोडवीत असतील ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येत आहे.
.....अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन
अशा बेजबाबदार आणि मुजोर ग्रामसेवक आणि सरपंच यांचेवर कठोर आणि कायदेशीर कार्यवाही करावी. जेणेकरून आपली लोकशाही अबाधित राहील आणि जनसामान्य जनतेला न्याय आजही जिवंत आहे याचे अवलोकन होईल.आणि जर एवढे करूनही आपण उचित कार्यवाही न केल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करावे लागेल आणि या आंदोलनाची तीव्रता एवढी मोठी राहील कि ज्याला शमविणे सहसा शक्य होणार नाही किंवा आपण फक्त आश्वासन देऊन हे आंदोलन थांबणार नाही. याची नोंद घ्यावी आणि यानंतर होणाऱ्या हानीस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची सुद्धा नोंद घ्यावी.असा खोचक इशारा यावेळी प्रशांत गाढे यांनी जळगाव जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदना द्वारे दिला.आता जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी काय अँक्शन घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.