रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या दि. १५ सप्टेंबर २०२२ ते ०२ ऑक्टोबर २०२२ या कालावधित 'स्वच्छता ही सेवा' मोहिमे अंतर्गत महाविद्यालयाच्या परिसर, आठवडे बाजार तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपूर येथे स्वच्छता करण्यात आली.[ads id="ads1"]
स्वयंसेवकांनी कचरा स्रोतांच्या ठिकाणी ओला व सुका कचरा वेगवेगळे करण्यासाठी व एकल प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती केली. तसेच सरपंच, ग्रामपंचायत ऐनपूर कार्यालयात कचरा वहनाकरीता वाहनांची खरेदी करणेबाबत विनंतीपूर्वक निवेदन रा. से. यो. स्वयंसेवकांनी दिले.[ads id="ads2"]
हे स्वच्छता अभियान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. या अभियानात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पाटील यांचे मार्गदर्शन स्वयंसेवकांना लाभले.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)