यावल (सुरेश पाटील)
तालुक्यातील अकलूज येथे यावल भुसावल रोडवर असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी पोदार जम्बो किड्स व पोदार इंटरनेशनल स्कूलचा महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. [ads id="ads1"]
विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत विविध शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले शिक्षकांनी व विद्यार्थींनी वर्गात गांधींजींच्या जीवनशैलीवर व राहणीमानावर सुंदर देखावे बनविले होते.पालकांसाठी व विद्यार्थांसाठी आईस्क्रीमच्या काड्यांपासून चरखा बनविणे, कागदापासून लाल बहादूर शास्त्रींची टोपी बनविणे.तीन माकडचे चित्राला बोटांच्या ठसांच्या सह्याने रंगविणे, प्रश्नमंजुषा अश्या प्रकारचे विविध मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.[ads id="ads2"]
पालक व गांधीजी,कस्तुरबाजी,लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या वेश भूशेतील विद्यार्थ्यांनी दांडी यात्रेच्या देखाव्यापर्यंत दांडी मार्च काढला. शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल शाह यांनी लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दोन्ही महापुरुषांचे पूजन केले. विद्यार्थांसाठी आयोजित केलेले विविध खेळ व देखावे हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा श्रृंगी यांनी मार्गदर्शन केले.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य आनंद हिरालाल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे व्यवस्थापक रामदास कुळकर्णी तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.