यानिमित्त शरबत हलवा, पेढे, आईस्क्रीम, मिठाई वाटपासोबत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून भव्य जुलूस काढण्यात आला होता. त्यात मुस्लिम बांधवांसोबत इतर धर्मीय नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे पैगंबर जयंतीत राष्ट्रीय एकात्मता दिसून आली.[ads id="ads2"]
ईद-ए-मिलाद निमित्त तरुणांनी मजितचे मौलाना यांच्यासह नांदगाव शहरातील इतर सर्व प्रमुख मौलानांच्या नेतृत्वाखाली सकाळी भव्य जुलूस काढण्यात आला. नारा-ए-तकदीर अल्लाह दु अकबर, दुदुर्ग दामत नही छोडेंगे. यासह इतर घोषणा देत जुलूस एच आर हायस्कूल कलंत्री गल्ली, शनी मंदिर रोड, पोलीस स्टेशन मार्ग, रेल्वे गेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी पुतळा या मार्गे मशिदीजवळ एच आर हायस्कूल जवळ संपन्न झाले. यावेळी जगात व देशात शांतता नांदावी. भारतात सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये सलोख्याचे कायम संबंध रहावे. सर्व क्षेत्रात देशाची भरभराटी व्हावी यासाठी विशेष दुवा करण्यात आले.
हेही वाचा : - Jalgaon : रावेर तालुक्यातील विवरे खु येथील शाळकरी विद्यार्थ्यीने बनविले हुबेहुब रेल्वे इंजन
नांदगाव तालुक्यातील आमदार सुहास अण्णा कांदे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ईद-ए-मिलाद निमित्त यासह इतर ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुप तर्फे पाणी, शरबत, आईस्क्रीम, मिठाई, चॉकलेट वाटप करण्यात आले. तर नांदगाव येथे ईद-ए-मिलाद निमित्त करण्यात आलेला जुलुस मुस्लिम धर्मीय बांधव व लहान बालके मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.



