उद्या येवल्यात 87 व्या धर्मांतर घोषणा निमित पंधराव्या मुक्ती महोत्सवाचे आयोजन - तीन दिवस विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन शेजवळ यांची माहिती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


नाशिक जिल्हा प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) मानव मुक्तीच्या गर्जनेने जगप्रसिद्ध झालेल्या मुंबई इलाखा दलित वर्ग परिषदेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या 87 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र मुक्ती महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महोत्सवाचे निमंत्रक तथा प्रवर्तक एस डी शेजवळ यांनी दिली आहे.[ads id="ads1"] 

       दिनांक 11 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या तीन दिवसीय मुक्ती महोत्सव अंतर्गत दिनांक 11 ऑक्टोबर रोजी स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमासाठी तयारी व आव्हाने या विषयावर शुभम निघून यांचे व्याख्यान आयोजित केले असून दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय संविधान संवर्धक व प्रचारक रोहित घोटेकर महाराज यांचे संविधान कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.[ads id="ads2"] 

   हे दोन्ही कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येवला (नाशिक) येथे रोज सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आले असून दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी मुक्ती भूमी येवला येथे बुद्ध आंबेडकर सामाजिक प्रबोधन गीतांचा आंबेडकरी शाहिरी जलसा अर्थात मुक्ती पहाट हा कार्यक्रम होणार असून ऐतिहासिक मुक्ती भूमी येथे स्मारकास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकास फुल हार, अगरबत्ती, उदबत्ती अगरबत्ती यावर निरर्थक खर्च करण्यापेक्षा ग्रामीण भागातील दलित आदिवासी, भटक्या विमुक्त व मागासवर्ग विद्यार्थ्यांना त्याच पैशातून शैक्षणिक साहित्य संकरित करण्यासाठी आव्हान केले जात निर्धारित खर्चाला फाटा देऊन शैक्षणिक उपयुक्त अशी शैक्षणिक (पेन, कंपास बॉक्स, दप्तर) सदर प्रसंगी दान घेण्यात येणार असून ती गरजू विद्यार्थी आश्रम शाळांना वाटप करण्यात येणार आहे.

हेही वाचा : - Jalgaon : रावेर तालुक्यातील विवरे खु येथील शाळकरी विद्यार्थ्यीने बनविले हुबेहुब रेल्वे इंजन

   त्याचबरोबर मुक्ती महोत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिर व सर्व निदान शिबिर यांच्या आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक वसिगृह अधीक्षक बी‌.डी खेळणार, अशोक पगारे, अभिमन्यू शिरसाट, शरद शेजवळ, सुरेश खळे, राजरत्न वाहूळ, एस एन वाघ, विश्वास जाधव, एम एस सोनवणे यांनी दिली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!