ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे 'फिट इंडिया फ्रिडम रन' चे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. बी. पाटील यांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने धावण्याचे महत्व विशद केले. सदर कार्यक्रमासाठी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रेखा पाटील, शिक्षकेतर कर्मचारी व रा. से. यो. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


