रावेर येथील श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त व्याख्यान संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर येथील श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त व्याख्यान संपन्न

रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)

रावेर येथील श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचा विद्यार्थी विकास विभाग आणि नाईकमहाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. [ads id="ads1"] 

  डॉ. एम. के. जाधव व डॉ. ताराचंद सावसाकडे यांचे व्याख्यान या निमित्ताने आयोजित केले होते. डॉ. एम. के. जाधव यांनी भारतीय स्वातंत्र्यलढा आणि फैजपूर काँग्रेस अधिवेशन या विषयावर व्याख्यान दिले .भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फैजपूर काँग्रेस अधिवेशन हे एक महत्त्वाचे पर्व आहे. धनाजी नाना यांच्या नेतृत्वात हे अधिवेशन यशस्वी झाले.असे मत डॉ.जाधव यांनी मांडले.[ads id="ads2"] 

   डॉ. ताराचंद सावसाकडे यांनी महात्मा गांधीजींचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या तरुणांना महात्मा गांधीजींच्या विचारांचा विसर पडला आहे. असे मत डॉ. सावसाकडे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी. व्ही. दलाल हे होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमातून महाविद्यालयाच्या तरुणांची मने संस्कारित होत आहेत. असे मत प्राचार्य डॉ. दलाल यांनी मांडले. 

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या 

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस.डी. धापसे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.जी.आर. ढेंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक एस. बी. धनले यांनी मानले. या कार्यक्रमाला सिनेट सदस्य डॉक्टर अनिल पाटील ,उपप्राचार्य डॉक्टर व्ही.बी. सूर्यवंशी ,डॉक्टर जे. एम. पाटील डॉक्टर ए.एन. सोनार, प्राध्यापक रमेश वाघ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!