न्हावी ता. यावल प्रतिनिधी (किरण तायडे) न्हावी (Nhavi Taluka Yawal Dist Jalgaon) येथील ६४ वर्षीय वृद्धाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात (Faijpur Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद झाली.[ads id="ads1"]
यावल तालुक्यातील न्हावी (Nhavi Taluka Yawal Dist Jalgaon) येथील रहिवासी जयंत काशीराम फिरके (वय ६४ ) हे गेल्या काही दिवसांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. सोमवारी दिनांक 17 ऑक्टोंबर 2022 रोजी ते घरी एकटे होते. यावेळी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. [ads id="ads2"]
सदर प्रकार हा दुपारी दोन वाजेच्या सुमारास निदर्शनास आला. फैजपूर पोलिसांना (Faijpur Police) कळवून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात (Yawal Rural Hospital) नेण्यात आला.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
यावल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन केले. नंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी फैजपूर पोलिसांत (Faijpur Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुली, जावई असा परिवार आहे.


