ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथून जवळच असलेल्या निंभोरा ता.रावेर येथील कृषी विद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पत्रकार संरक्षण समिती चा सन्मान सोहळा संपन्न झाला .[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील निंभोरा बु येथे दिनांक १६/१०/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता नुकत्याच पत्रकार संरक्षण समिती रावेर ग्रामीण तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आलेली असून या नुतन रावेर तालुका ग्रामीण पत्रकार संरक्षण समिती च्या सर्व कार्यकारिणी व सदस्य यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.[ads id="ads2"]
या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष निंभोरा येथील प्रल्हाद भाऊ बोंडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून समिती चे जेष्ठ सल्लागार राजीव बोरसे हे होते या सन्मान सोहळा कार्यक्रमात सर्व पत्रकारांना ट्राफी, नियुक्ती पत्र व फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले पत्रकार समितीचे ग्रामीण तालुका अध्यक्ष प्रदिप पंजाबी महाराज यांनी समितीचे ध्येय व धोरणे हे पटवून सांगितले व पत्रकारांच्या भविष्यासाठी काय उपाययोजना करता येतील या बाबतीत माहीती दिली.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
या सन्मान सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद भाऊ बोंडे, जेष्ठ सल्लागार राजीव दादा बोरसे, ग्रामीण तालुका अध्यक्ष प्रदिप पंजाबी महाराज, तालुका उपाध्यक्ष सुमित पाटील, युसुफ शहा, भिमराव कोचुरे, तालुका सचिव विजय एस अवसरमल, सहसचिव अनिल आसेकर ,संघटक अनिल इंगळे, योगेंद्र भालेराव , तसेच समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.