रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर येथून मोटारसायकल चोरून नेल्याप्रकरणी चोरट्यांना अटक करण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे . चोरट्यांकडून पोलिसांनी दोन मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.[ads id="ads1"]
रावेर येथील बऱ्हाणपूर रोडवर असलेल्या मंगल कार्यालयासमोरून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल ( एमपी ०८३७ ) ही २५ एप्रिल रोजी चोरून नेली होती . याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . गुन्ह्याचा तपास करीत असताना ही मोटारसायकल ही बेवारस स्थितीत अर्जदा रोडवरील दत्तू पाटील यांच्या केळीच्या शेतात मिळून आली होती.[ads id="ads2"]
परंतु आरोपीचे नाव , गाव निष्पन्न झाले नव्हते . पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी तपासाची चक्र फिरवली . त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शीतलकुमार नाईक , नापोकॉ . विष्णू भिल , पोका समाधान ठाकूर , पोकॉ . सचिन घुगे , पोकॉ . प्रमोद पाटील , पोका , विशाल पाटील , पोकॉ . सुकेश तडवी , पोकॉ . अमोल जाधव पोका विकार शेख , पोकॉ . रवींद्र भामरे या पोलिस पथकाने आरोपी गजानन हरी वेलदार , रा वराड , ता . बोदवड
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
हबीब लालखाँ मुलतानी , रा . वराड खुत्ता , बोदवड , महादेव युवराज बेलदार , पुरनाड , ता . मुक्ताईनगर यांना चोरी प्रकरणी ताब्यात घेतले . आरोपींनी गुन्ह्याची कबूल दिली आहे . बोदवड येथून चोरलेल्या हिरो कंपनीच्या एच एफ डिलक्स काळया लाल पट्टे असलेल्या विना नंबर दोन मोटारसायकली काढून दिल्या आहेत. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस नायक विष्णू भिल हे करीत आहेत.