रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दि.17 वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याची महत्वपूर्ण बैठक आज दि17. दुपारी 12.30 वाजता नवीन विश्रामगृह रेस्ट हाऊस येथे वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. [ads id="ads1"]
या बैठकीत जळगाव येथे सत्ता संपादन मेळावा श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वात सत्ता संपादन मेळावा दि.21,10,2022 शुक्रवार रोजी आयोजित केला असून या मेळाव्याच्या तयारीसाठी रावेर तालुक्यातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. [ads id="ads2"]
जिल्हा उपाध्यक्ष रफिक बॅग यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की वेळ कमी असल्या मुळे कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त खेड्यापाड्यावरती फिरून या मेळाव्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगून जळगाव येथे उपस्थित राहायचे आहे असे ते म्हणाले. तसेच जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजीर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे हे अध्यक्ष भाषणात म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा वरती सत्ता संपादन मेळावे होत असून श्रद्धे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये जळगाव येथे सुद्धा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व तालुका कार्यकर्त्यांनी महिला आघाडीच्या तालुका कार्यकर्त्यांनी रावेर शहर कार्यकारिणी तसेच सावदा शहर कार्यकारणी संपूर्ण रावेर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या शाखा कार्यकारणी तसेच आजी-माजी तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी शाखा पदाधिकारी यांनी जळगाव येथील सत्ता संपादन मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचे आहेे.
असे आवाहन बाळू शिरतुरे यांनी केले. या बैठकीसाठी रावेर तालुका उपाध्यक्ष सलीम शहा तालुका सचिव राजेंद्र अवसरमल, तालुका सचिव अर्जुन वाघ तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तायडे, तालुका संघटक कंदर सिंग बारेला तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे, शहराध्यक्ष शेख इमरान शेख नसीर , शहर उपाध्यक्ष दौलत अडांगळे, तरुण सवरने, भूषण सवरने, शेख यासीन शेख याकूब इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.


