कोळी समाज उत्सव समितीची महर्षी वाल्मिक जयंती निमित्त बैठक संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी) रावेर तालुक्यातील कोळी समाज उत्सव समितीची बैठक आज दिनांक 7/10/2022 रोजी शासकीय विश्रामगृह सावदा येथे महर्षी वाल्मिक जयंती निमित्त मा. जेष्ठ मार्गदर्शक गंभीर दादा उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उत्सव समिती अध्यक्ष नितीन भाऊ कोळी आदिवासी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ सपकाळे, तालुकाध्यक्ष मनोहर कोळी, कोळी समाज तालुकाध्यक्ष बंडु भाऊ कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.[ads id="ads1"] 

त्यावेळी तालुकास्तरावर महर्षी वाल्मिक जयंती निमित्त मोटरसायकल रॅली काढून शासकीय स्थानी प्रतिभा पूजन करून सोप्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात यावी असे ठरले. तसेच कोणत्याही इतर राजकीय व इतर व्यक्ती जवळून वर्गणी जमा न करता फक्त तालुक्यातील समाजातील सर्व पक्षीय बांधवांकडूनच जो काही किरकोळ खर्च येत असेल तो खर्च स्वखुशीने आपल्या इच्छेनुसार जमा करण्यात यावा असे ठरले. [ads id="ads2"] 

  कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे ठरविण्यात आली. रॅली गाते गावापासून सुरुवात होईल तेथे थोरगव्हाण, मांगी, चुनवाडे, तासखेडा, गहुखेडा, रायपूर, रणगाव, सुतगाव, उधळी लुमखेडा, लहान वाघोदा या गावातील समाज बांधवांनी ठीक सकाळी 9.00 वाजता हजर रहावे तिथून स्टेशन मार्गे मस्कावद येथे सकाळी 9-30 वाजता, कोचुर, रोझोदा येथील समाज बांधवांनी यावे व तेथून सुनोदा मार्गे तांदलवाडी येथे ठीक 10 - 30वाजता मागंलवाडी येथील बांधवांनी येऊन तेथून निंभोरा येथे 11-00 वाजता दसनुर, आदलवाडी, वाघोदा येथील समाज बांधवांनी हजर राहून तेथुन खिर्डी येथे 11. 15 वाजता भामंलवाडी, पुरीगोलवाडे, रेभोटा, वाघाडी, धामोडी, कांडवेल येथील बांधवांनी यावे व तेथून ऐनपुर येथे 11.30 वाजता कोळदा, सुलवाडी बांधवांनी यावे तेथून जुने निंबोल येथे 11.45 वाजता विटवा, निंभोरासिम, सांगवे, पातोंडी, धुरखेडा, नेहता, दोधा, अटवाडे, मोरगाव, खिरवड, नादुरखेडा, तामसवाडी, पुनखेडा, खानापूर, चोरवड व इतर पंचक्रोशीतील समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने हजर रहावे. 

हेही वाचा :- Tractor Subsidy Scheme : ट्रॅक्टर साठी मिळणार शासनाच्या "या" योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदान  ; असा करा अर्ज

तेथून रावेर तहसील कार्यालय व पं. स. कार्यालय येथे प्रतिमा पुजन ठिक 1.00 वाजता करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. तरी सर्व समाज बांधवांनी आपले आराध्य दैवत आद्यकवी महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी हा महत्त्वाचा उत्सव सोहळा पुर्ण ताकतीने व जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दाखवून समाज जागृतीचे व एकतेचे प्रतिक म्हणून हा जयंती उत्सव कोणत्याही एका राजकीय पक्षाचा व संघटनेचा तसेच एकट्या व्यक्ती चा नसुन हा सर्व समाज बांधवांचे कुलदैवत यांचा आहे. काही स्वार्थी लोक यात राजकारण करून दिशाभूल करीत असतील तर त्यापासून समाज बांधवांनी जागृत रहावे. तसेच काही मतभेद, विचार, मान सन्मान, फोन, फोटो, या शुल्क गोष्टी बाजुला ठेवून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून जनजागृती व प्रसिध्दी करुन हा जयंती उत्सव साजरा करावा ही नम्र विनंती करण्यात आली.

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

सर्व उत्सव समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले त्यावेळी उत्सव समिती चे ता. उपाध्यक्ष सुपडु मोरे, ता. मार्गदर्शक विजय तावडे, ता. सल्लागार नितीन सपकाळे, ता. सहसचिव ईश्वर कोळी, आदिवासी कोळी महासंघाचे ता. उपाध्यक्ष गफ्फुर कोळी, सचिन महाले, रवी महाले, देविदास कोळी, गणेश कोळी, चुडामण कोळी, माधव दास झाल्टे, आदी समाज बांधव उपस्थित होते प्रस्तावना व सुत्रसंचालन उत्सव समिती चे सचिव राजेन्द्र महाले यांनी केले तर आभार मनोहर कोळी यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!