धरणगाव तालुका शासकीय क्रीडा स्पर्धा संदर्भात सहविचार सभा संपन्न...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगाव - तालुक्यातील माध्यमिक व उच्च मध्य विद्यालयाच्या सन 2022 / 23 च्या शासकीय क्रीडा स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचे तालुका क्रीडा शिक्षकांच्या सहविचार सभेत ठरले.[ads id="ads1"] 

            दि. 7 रोजी सकाळी 12 वाजता प.स.धरणगाव येथील हॉलमध्ये क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा घेण्यात आली. कोरोना काळात गेल्या दोन वर्षात पावसाळी क्रीडा स्पर्धा झालेल्या नव्हत्या.  यावर्षी होणाऱ्या पावसाळी क्रीडा स्पर्धा 15  ते 25  नोव्हेंबर दरम्यानच्या काळात होणार आहेत. यात खोखो, कबड्डी, बुद्धिबळ, कुस्ती,  कराटे, तायक्वॉन्दो, व्हॉलीबॉल, क्रिकेट व मैदानी खेळांचा समावेश आहे.  सुनिल शिसोदे सर मुख्य.जि.प.शाळा उखळवाडी व सुनिल झोपे सर मुख्य. साळवा हायस्कूल यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली .  [ads id="ads2"] 

            यावेळी सर्वप्रथम  धरणगाव तालुका क्रीडा समन्वय श्री सचिन सूर्यवंशी सर यांना राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे  क्रीडा शिक्षक श्री के स पाटील सर , श्री संदेश महानुभाव सर श्री एम डी परदेशी सर श्री भूषण रायगडे सर यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल या सर्वांचाही सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे जी पी एस महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री राकेश धनगर सर राज्यस्तरीय कबड्डी खेळाचे पंच परीक्षा पास झाल्याने त्यांच्याही सत्कार करण्यात आला तसेच आदर्श विद्यालयाची क्रीडा शिक्षक श्री गावित सर यांनी जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षकांच्या झालेल्या स्पर्धेमध्ये 100 मीटर व दोनशे मीटर स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेला होता त्यांच्याही सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

            या वेळी तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर बी महाले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन एम डी परदेशी सर यांनी मानले स्पर्धाआयोजनासाठी सर्व विद्यालयातील क्रीडाप्रेमिनीं सहकार्य करण्याचे आवाहन तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!