सांगली - साप बघितलं की बरेच लोकांना अंगावर काटा येतो कारण समाजा मध्ये सापांविषयी खुप सारे गैरसमज अंधश्रद्धा पसरवली आहे. जसं की साप दूध पितो, नागाच्या डोक्यावर नाग मनी असते, इच्छाधारी नाग सापाला मंत्राने रोखू शकतो, साप चावला की मंत्र तंत्र करुन विष उतारू शकतो, साप डुक धरतो, असे अनेक गैरसमज, अंधश्रद्धा पसरली गेली आहे, हे सर्व खोटे, दंतकथा, व अशास्त्रतीय आहे. भारतात जवळ जवळ २७८ पेक्षा आधीच साप आढळतो.
त्यातील काही विषारी, निमिविषारी, बिनविषारी साप आहेत. सापांचे पुराण ग्रंथामध्ये सुद्धा उल्लेख आढळून येतो. भारतामध्ये सापांचे अनेक मंदिर आहेत. सापाला इतके महत्व का दिला आहे ? असं प्रश्न पडला असेल. कारण साप निसर्गातील खुप महत्वाचे व अन्न साखळीतील महत्वाचे घटक असून त्यांचे स्वरक्षण व संवर्धन केला आहे. साप कधीच कोणाला त्रास देत नाही, किंबहुना कोणाला जाणूनबुजून चावत नाही. जेव्हा सापाला वाटतो की, त्याच्यावर हल्ला होत आहे, तेव्हाच आत्मरक्षण करण्यासाठी डंक करतो. असं माणूस सुद्धा करतो ना ! सापाला जबरदस्ती दुध पाजले जाते. हा अंधश्रद्धा आणि गैरसमज आहे. साप कधीच दूध पीत नाही. सापाचा खाद्य दुध नसून उंदीर, बेडूक, सरडे, छोटे साप, अंडी आहेत. म्हणून कोणी सापाला दुध पाजू नये. दुधा मध्ये कॅल्शियम असते. सापाला दुध पचत नाही. त्याला जुलाब, उलट्या होऊन मरतो. आपला उद्देश चांगला असेल, पण अशास्त्रीय माहिती, गैरसमजा मुळे साप मरतो. उंदरांपासून पसरणाऱ्या प्लेग, लेप्टोस्पायरोसीस इ. जिवघेण्या रोगांचे उगमस्थान असणारे उंदीर यांना साप खाऊन नष्ट करतो. साप शेतकऱ्यांनचा खरा मित्र आहे. शेतातील एकूण धान्याच्या ३०-४० % धान्याची नासाडी करणाऱ्या उंदिर व घुशींना साप खाऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. असं अनेक सापाचे महत्व निसर्गात आहे. म्हणून कोणीही सापाला त्रास देऊ नये, सापाला मारू नये. तसं कोणी केला तर भारतीय वन्य जीव कायदा १९७२ अन्वये गुन्हा असून ३ ते ७ वर्षा पर्यंत शिक्षा, व रु.१०, ००० ते २५, ००० रुपये पर्यंत दंड आहे. साप चुकून कोणाच्या घरी आला तर अनुभवी सर्पमित्र किंवा वन विभाग १९२६ या टोल फ्री नंबर
-
अँड बसवराज होसगौडर ( मुक्त पत्रकार )
(निसर्गमित्र, पक्षी मित्र सांगली)
९७६२५५८०६६

