सावदा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावदा पोलीस ठाण्याच्या(Savda Police Station) हद्दीतून गुंराची निर्दयतेने वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता पोलीसांनी चिनावल ते कुंभारखेडा(Chinawal To Kumbharkheda) रस्त्यावरील निर्मल युवराज महाजन यांच्या शेतातजवळ दोन टाटा कंपनीचे छोटा हत्ती क्रमांक (एमएच ०४ डीके ७१०२ आणि एमएच ०४ इवाय २११८) वाहनांची तपासणी करण्यात आली. [ads id="ads2"]
या दोन्ही वाहनांमध्ये ५ गायी आणि ४ वासरे यांनी निर्दयतेने बांधून अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही वाहने पोलीसांनी जप्त केली असून गुरांची सुटका करण्यात आली आहे.
मोबाईल नंबर टाकून असा पहा लोकेशन
सावदा पोलीस ठाण्याचे(Savda Police Station) पोलीस कॉन्स्टेबल तुषार मोरे यांच्या फिर्यादीवरून शेख आबिद उर्फ नव्वद शेख आणि मोहम्मद फैजान शेख सगीर दोन्ही रा. सावदा ता.रावेर यांच्या विरोधात सावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद तडवी करीत आहे.


