Dharangaon : जीएसए स्कुलमध्ये वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



📘मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी - मुख्या. नाजनीन शेख

📗धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर  

धरणगाव -- येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे भारताचे पूर्व राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"] 

              याबाबत अधिक माहिती अशी की, शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी मिसाईल मॅन डॉ. कलामांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण केली. विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने डॉ. कलामांचा जन्मदिवस हा 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. शाळेतील शिक्षिका नाजनिन शेख यांनी डॉ. कलामांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले. [ads id="ads2"] 

  पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग या भारतातील प्रचलित नावांचा वापर करून क्षेपणास्त्र तयार करून जगाला आपले सामर्थ्य व अवकाश क्षेत्रातील योगदान सिद्ध करण्यात डॉ. कलमांचा सिंहाचा वाटा आहे. वाचन करणं का गरजेचं आहे? याचे महत्व पटवून देण्यात आले. महापुरुषांना समजून घ्यायचे असेल तर आपण त्यांचे आत्मचरित्र व चरीत्र वाचले पाहिजे. 'जब मैं भारत को सरलता की निगाहों से देखता हुं तब मुझे ना हिंदू ना की मुसलमान नजर आता हैं, बस हर इंसान में सिर्फ विवेकानंद और कलाम नजर आता हैं।' अशा शब्दांत मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी कलामांची महती वर्णन केली. 

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

              कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्यासह जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी केले.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!