जायखेडा पोलिसांनी सिनेस्टाईल थरार करून पकडली लाखो रुपयांची विदेशी दारू : दोन जणांना केले जेरबंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


सटाणा नाशिक ग्रामीण प्रतिनिधी (अमोल बैसाने)  दिनांक १४/१०/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजेचे सुमारास जायखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की एक महिंद्रा कंपनीची XUV 500 कार वाहन क्रमांक GJ-19 AA-3388 या वाहनातून दोन इसम विनापास परमिटाशिवाय अवैधरित्या विविध प्रकारच्या विदेशी दारूच्या बाटल्यांची वाहतूक करून पिंपळनेर कडून ताराबाद कडे येत आहे अशी माहिती मिळाल्यावर त्यांनी लागलीच[ads id="ads1"]  ताराबाद पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांना अधिनस्त पोलिस अंमलदार यांचे एक पथक बनवून ताराबाद गावातील अंतापुर चौफुलीवर सापळा लावण्याबाबत आदेशित केल्याने पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांनी त्यांचे समवेत पोलीस हवालदार गोपीनाथ भोये पोलीस हवालदार सुनील पाटील पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पवार व होमगार्ड राकेश नवसार अशांचे पथक तयार करून अंतापुर चौफुलीवर सापळा लावला असता आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास मिळालेल्या बातमी प्रमाणे वरील नमूद वाहन क्रमांकाची कार पिंपळनेर कडून ताराबाद कडे येत असताना पोलीस उपनिरीक्षक रसाळ व पथकाने सापळा लावून अंतापुर चौफुली येथे जागीच पकडण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन चालक व त्याचा सोबतचा भरधाव वेगाने वाहन चालवण्याचा प्रयत्न करत असताना तहराबाद गावातील व करंजाड गावातील ग्रामस्थांनी पोलिसांची मदत करून नमूद संशयित कार पकडण्यासाठी पोलिसांना योग्य ती मदत केली.[ads id="ads2"] 

त्यानंतर पोलिसांनी नमूद कार मधील वाहन चालक व त्याचे असणाऱ्या इसमांना कारमधून बाहेर काढून विचारपूस केली असता ते उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने पोलिसांनी सदर वाहनाची झडती घेतली असता वाहनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी दारूच्या दारूबंदी गुन्ह्यांचा* सुमारे १,५७,०१० /- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला.   पोलिसांनी सदरचा मुद्देमाल व सुमारे १० लाख रुपये किमतीची कार असा *एकूण* *११,५७,०१०/-*  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

सदरच्या कार वरील *वाहन चालक किसन लक्ष्मण गाणी वय ३० वर्षे राहणार धरम नगर रोड, सुरत (गुजरात राज्य) व त्याचे सोबतचा इसम उमेश किसन यादव वय 28 वर्षे राहणार नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार* यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 अ, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वर नमूद दोन्ही इसमांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ हे करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!