प्रमुख पाहूणे म्हणून प्रा डॉ अरूण पाटील भाऊसाहेब नेने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पेण,जि रायगड, श्रीमती नंदा पाटील, पेण उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा प्रदिप तायडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी मार्गदर्शन केले. संस्थाने विलीनीकरण केले हे महान कार्य त्यांनी केले.[ads id="ads1"]
सरदार वल्लभभाई पटेलांनी राष्ट्र उभारणीसाठी केलेले कार्य तसेच शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी दिली. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ दिपक पाटील यांनी केले.
हेही वाचा :- कुशीनगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे असलेल्या बर्हाणपूरच्या युवकाचा रेल्वे मधून खाली पडल्याने मृत्यू ; सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना
राष्ट्रीय एकता दिनाची शपथ अल्ताफ पटेल यांनी दिली. आभार सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ एस बी पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी अशी एकूण ९७ व्यक्ती उपस्थित होते.