नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल)
नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव तालुक्यातील मनमाड मधील एक धक्कादायक प्रकारासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे कारण मनमाड उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृतदेहाची अक्षरशा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून मृतदेहावर चक्क मुंग्या फिरत असल्याची समोर आले आहे.[ads id="ads1"]
मनमाड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक सुविधांचा अभाव दिसुन येत आहे. याचा सर्वसामान्य रुग्णास आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास होतोय. मात्र मनमाड उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या मृतदेहासही या सुविधांची झळ बसली आहे.[ads id="ads2"]
याबाबत सविस्तर कसे की, मनमाड शहरातील रमाबाई नगर येथील तरुणीचा अकस्मात मृत्यू झाला. तिच्या निधनानंतर शवविच्छेदन करून तिचा मृतदेह रात्रभर रुग्णालयातच ठेवण्यात आला होता. मात्र रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी ज्या शीत पेट्या वापरल्या जातात त्या बंद होत्या. त्यामुळे मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हा मृतदेह शीतपेटीविना बाहेर ठेवावा लागला. सकाळी नातेवाईक जेव्हा मृतदेह नेण्यासाठी आले त्यावेळेस शेव-विच्छेदन रूममध्येच सदर तरुणीचा मृतदेह हा बेवारस पडलेल्या सारखा दिसून आला. त्या मृतदेहावर अक्षरशः मुंग्या लागून मुंग्यांची रांग लागली होती.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
याबाबत नातेवाईक यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त करत जिवंत माणसाला नाही तर किमान मृत व्यक्तीला तरी सुखाने जाऊ द्या अशी भावना व्यक्त केली. तसे पाहता मनमाड हे नाशिक जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर असून जवळपास दीड लाख लोकसंख्या ही येथील आहे. त्या दृष्टीने मनमाड येथे उपजिल्हा रुग्णालयाची वास्तु उभारण्यात आली. मात्र ही शोभेची वास्तु ठरत असून, ३१ मे 2022 रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नरभवणे हे सेवानिवृत्त झाले.
तेव्हा पाच महिने उलटले तरीदेखील या उपजिल्हा रुग्णालयात अजूनही अधीक्षक भरले गेलेले नाही. करिती काही परिचारिका रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अरे रावीची भाषा करतात. याबाबत तक्रारी केल्या तर यांचे वर राजकीय प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतात. केंद्र आणि राज्य सरकार या आरोग्यासाठी करोडो रुपये खर्च करत असतात. या रुग्णालयात बंद पडलेली शीतपेटी दुरुस्त होऊ शकत नाही हे मनमाड करायसाठी दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

