रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर तालुक्यातील विवरे (Vivare Taluka Raver Dist Jalgaon) येथील आपल्या बहिणीला भाऊबीज (Bhau Beej) साठी जात असताना गाते गावाकडून वाघोदा खुर्द गावाजवळ (Waghoda Khurd) युवकाचा बाईक अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.[ads id="ads1"]
सविस्तर माहीती अशी की विवरे येथील बहीणीस भाऊबीजसाठी घेण्यास चेतन सुभाष खेवलकर वय ३५ राहणार - राजूर तालुका-बोदवड(Rajur Taluka Bodwad) हा त्याच्या हिरो कंपनीची सुपर स्पेन्डर काळ्या रंगाची मोटार सायकल क्रमांक एम एच १५डी. इ. ५५१९ यावर येत असताना गाते ते वाघोदा खु। दरम्यान वाघोदा खुर्द गावाच्या जवळच रोडवर भरधाव वेगात येत असतांना रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत हयगयीने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल चालवित असतांना रोडवरून समोरून जाणा-या कुत्र्यास ठोस मारून तो मोटार सायकलवरून खाली पडून त्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने मृत्यू झाला.[ads id="ads2"]
त्याच्या स्वतःच्या मरणास व मोटार सायकलीचे नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : रावेर तालुक्यातील एका गावातील महिलेचा राहत्या घरात एकाने केला विनयभंग ; पोलिसात गुन्हा दाखल
👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी
👉 हेही वाचा :- दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
सदर घटनेचा पुढील तपास सावदा पोलीस ठाण्याचे (Savada Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांचे मार्गदर्शन खाली गुन्ह्याचा पुढील सहाय्यक फौजदार पांडुरंग सपकाळे ,संजय चौधरी हे करीत आहेत.


