बाल विवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत धरणगावात कँडल मार्च

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



धरणगाव प्रतिनिधी -पी.डी.पाटील सर

धरणगाव : येथे  दि. १६ ऑक्टो, २२ रोजी अमळनेर येथील साने गुरुजी फाउंडेशन व पारोळा येथील मनोजालाय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धरणगाव शहरात कँडल मार्च काढून रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. [ads id="ads1"] 

              याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासन निर्देशानुसार बाल विवाह मुक्त भारत झाला पाहिजे यासाठी काल देशभरात जनजागृती करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर धरणगाव शहरात देखील कँडल मार्च तसेच बॅनर, पत्रके याद्वारे जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात तात्यासाहेब महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना माल्यार्पण करून करण्यात आली. [ads id="ads2"] 

  धरणी चौकातून सुरू झालेली रॅली कोट बाजार, लालबहादूर शास्त्री स्मारक, परिहार चौक, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथपर्यंत आली. रॅलीच्या दरम्यान सर्व महापुरुषांना माल्यार्पण व मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आले. सर्व महापुरुषांनी अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करून समाज जागृती घडवली म्हणून त्याठिकाणी जयघोष करण्यात आला. समारोप प्रसंगी छत्रपतींच्या स्मारकाजवळ सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बालविवाहाला कडाडून विरोध केला पाहिजे, असा सूर सर्व मान्यवरांच्या बोलण्यातून जाणवला. 

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या 

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

               कार्यक्रम प्रसंगी धरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय जिभाऊ पाटील, पीएसआय अमोल गुंजाळ, स.फौ. ज्योती चव्हाण व सर्व स्टाफ यांच्यासह कु. निधी, कु.परी तसेच साने गुरुजी फाउंडेशन चे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मनोजालाय फाउंडेशन चे अध्यक्ष विजय मिस्तरी, ग्रा. रु. चे समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी, जेष्ठ पत्रकार कडूजी महाजन, अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, विवरे येथील महिला बचत गट अध्यक्षा जयश्री गणेश पाटील, साने गुरुजी फाउंडेशनच्या अश्विनी शिंपी, दिपाली भावे, आशाबाई पाटील, वैशाली लोहार, वैशाली लोखंडे, शैलाबाई लोखंडे, मंगलाबाई नाथबुवा, प्रतिभा माळी, महात्मा फुले हायस्कूलचे हेमंत माळी, पत्रकार धर्मराज मोरे, जितेंद्र महाजन, अविनाश बाविस्कर, निलेश पवार, सेवानिवृत्त प्रा.आर.एन.भदाणे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोरसे, किशोर पवार सर, दिनेश भदाणे, विक्रम पाटील, प्रफुल पवार, ग्रा.रु.चे प्र. शाळा तंत्रज्ञ राजेश्वर काकडे, दिनेश बडगुजर, राहुल पाटील, नामदेव मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!