रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी)
ऐनपूर:स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवा निमित्ताने विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि २० ऑक्टोबर गुरुवार रोजी दुपारी १ वाजता सामान्यज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले.[ads id="ads1"]
सामान्यज्ञान परीक्षेचे आयोजन सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर, श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय रावेर, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, कला व विज्ञान महाविद्यालय भालोद आणि पी. ओ. नाहाटा महाविद्यालय भुसावळ येथे करण्यात आले होते. रावेर येथील 51, फैजपूर येथे 42, भालोद येथील 49, भुसावळ येथील 28 आणि ऐनपूर येथील परीक्षा केंद्रावर 78 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. [ads id="ads2"]
सदर परीक्षेच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. जी. आर. ढेबंरे, प्रा. वसुंधरा फेगडे, प्रा. सी. व्ही. वानखेडे आणि प्रा. किरण वारके यांचे सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सतिश वैष्णव, प्रा. डॉ. रमेश भोळे, डॉ. दिपक पाटील, प्रा. सुनिल इंगळे, डॉ. जयंत नेहेते, प्रा. साईनाथ उमरीवाड, प्रा. डॉ. संदीप साळुंके, प्रा. संकेत चौधरी, प्रा. केतन बारी यांनी परिश्रम घेतले.