बंद घरे चोरट्यांना ठरली पर्वणी: चोरट्यांनी बंद घरातून 95 हजारांचा मुद्देमाल लांबवला : अज्ञात चोरट्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल
रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर शहरातील बाबाजी नगर (Babaji Nagar, Raver) येथील घर बंद असल्याची चोरट्यांनी संधी साधत तब्बल 95 हजार रुपयाचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रावेर पोलिस स्टेशनमध्ये (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]
बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर
रावेर शहरातील बाबाजी नगर (Babaji Nagar, Raver) येथील सेवानिवृत्त सफाई कामगार लक्ष्मण बाबू रील (वय -53) हे कुटुंबासह वास्तव्यास असून ते कुटुंबासह बाहेर गावाला कामा निमित्त गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी 4 ते 6 दरम्यान साधली. [ads id="ads2"]
चोरट्यांनी कपाटातील तब्बल 95 हजार 400 रुपयांचे दागिने लांबवले. रील कुटुंब गावावरून परतल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी रावेर पोलीस स्टेशन (Raver Police Station)मध्ये धाव घेत रावेर पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर पोलीस स्टेशन(Raver Police Station) चे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक हे तपास करीत आहेत.
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा



