रावेर तालुका प्रतिनिधी(विनोद कोळी) रावेर तालुक्यातील मुदत संपलेल्या 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची पूर्ण तयारी महसूल प्रशासनाने पूर्ण केली आहेत या गावांच्या मतदार याद्या 21 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आले आहे.[ads id="ads1"]
रावेर तालुक्यातील सनोदा , गाते, थोरगव्हण , वाघोदा बुद्रुक,खिरवळ , निंभोरासीम, धुरखेडा, नांदूरखेडा , अजंदे,नेहेते, अटवाडे,दोधे,कुंभारखेडा ,सावखेडा बुद्रुक ,सावखेडा खुर्द ,खिरोदा प्र. यावल, जानोरी , भातखेडा ,कोचुर खुर्द , बोरखेडासिम ,बलवाडी, कांडवेल , व सिंगर या 22 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया आगामी काळात होणार आहेत. [ads id="ads2"]
प्रशासनाने निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे .प्रशासन सज्ज आहेत असे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे साहेब सांगितले.
मुदत संपलेल्या या गावात निवडणूक लढण्याच्या तयारी असलेल्या इच्छुकांनी गावात गाठीभेटी घेणे सुरू केलेले आहे गेल्या पाच वर्षात विद्यमान सदस्यांनी कोणतेही प्रश्न सोडवले व कोणते प्रश्न सोडविले नाहीत यावर गावामध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत .



